देवस्थानांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 00:04 IST2020-06-07T00:04:07+5:302020-06-07T00:04:17+5:30

थोरात म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने राज्यात नुकसान झाले. कोकणातील काही तालुक्यांमध्ये खूपच मोठे नुकसान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तेथे भेट दिली आहे.

Decision regarding temples from senior level - Balasaheb Thorat | देवस्थानांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन - बाळासाहेब थोरात

देवस्थानांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन - बाळासाहेब थोरात

संगमनेर (जि़ अहमदनगर) : तिरूपती बालाजी मंदिर सुरू होणार असेल तर तसा विचार आपल्यालाही करावा लागणार आहे. परंतु आजच्या परिस्थितीचा सर्वसमावेशक विचार करून उच्चस्तरीय पातळीवर चर्चा होऊन राज्यातील देवस्थानांबाबत निर्णय घेतला जाईल,असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने राज्यात नुकसान झाले. कोकणातील काही तालुक्यांमध्ये खूपच मोठे नुकसान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तेथे भेट दिली आहे. सह्याद्री पर्वत रांगाच्या पलीकडील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्येही नुकसान आहे. या सर्वांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत हे काम पूर्ण होईल. रायगड जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, अलिबाग आदी ठिकाणच्या नुकसानीचे स्वरूप फारच कठीण आहे. त्यामुळे तिथे काही वेगळे निर्णय घेणे अपेक्षित होते. ते मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत, असेही मंत्री थोरात म्हणाले.

Web Title: Decision regarding temples from senior level - Balasaheb Thorat