दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:38 IST2021-06-30T15:34:53+5:302021-06-30T15:38:43+5:30
दहिसरच्या रावळपाडा परिसरात एका ज्वेलर्सवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.

दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू
मुंबई: दहिसरच्या रावळपाडा परिसरात एका ज्वेलर्सवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. यात ज्वेलर्स मालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. तसेच घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या मागचे कारणही पोलीस शोधत आहेत. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्वेलर्स मालक जोरदार विरोध करतोय यामुळे आपल्याला दरोडा टाकता येणार नाही, तर आपण पकडले देखील जाऊ अशी भीती दरोडेखोरांना सतावल्याने त्यांनी ज्वेलर्स मालक शैलेंद्र पांडे याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शैलेंद्र पांडे यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे दहिसर भागात एकच खळबळ उडाली आहे.
एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून हे दरोडेखोर आले होते आणि ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यानंतर ज्वेलर्स मालकाची हत्या करुन याच काळया रंगाच्या दुचाकीवर बसून ते तिघेही फरार झालेले आहेत. सध्या मुंबई गुन्हे शाखा आणि दहिसर पोलिसांनी सीसीटीवी फुटेजच्या माध्यमातून एका आरोपीला ताब्यात घेतला आहे. त्याच्या आणखी दोन साथीदाराचा शोध देखील पोलीस घेत आहेत.