लेकीनं पगाराच्या पैशातून स्पेशल गिफ्ट दिलंय, सुप्रिया सुळेंना अत्यानंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:59 IST2021-07-01T13:46:53+5:302021-07-01T13:59:21+5:30
सुप्रिया सुळे यांनी 30 जून रोजी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

लेकीनं पगाराच्या पैशातून स्पेशल गिफ्ट दिलंय, सुप्रिया सुळेंना अत्यानंद
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस 30 जून रोजी साजरा झाला. आपल्या कुटुंबीयांसमेवत घरीच साधारपणे त्यांनी वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसासाठी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिने स्वत:च्या पैशाने केक आणला होता. लेकीनं दिलेलं हे गिफ्ट आईला भावूक करुन गेलंय. त्यामुळेच, सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन या केकभेटीचं कौतुक करणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी 30 जून रोजी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 'आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवस साजरा केला, हे क्षण अनमोल आहेत', असं यावेळी सुप्रिया सुळेंनी लिहिलं होतं. त्यानंतर, आज केकचा स्वतंत्रपणे फोटो शेअर करत खासदार असलेल्या आईने लेकीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट... कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं', अशा भावनिक शब्दात सुप्रिया सुळेंनी आनंद शेअर केला आहे.
हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट... कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं. pic.twitter.com/yGYpu2HFsE
— Supriya Sule (@supriya_sule) July 1, 2021
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना देशभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीसह विविध राजकीय नेतेमंडळींनीही सोशल मीडियातून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियातून सुप्रिया सुळेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यामुळे, खासदार सुळे यांनीही सोशल मीडियातूनच सर्वांचे आभारही मानले आहेत.
आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवसाचा हा क्षण साजरा केला. हे क्षण अनमोल आहेत. pic.twitter.com/lfViwPxqrc
— Supriya Sule (@supriya_sule) June 30, 2021
नमस्कार, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल आपले मनापासून आभार. यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटात आपण आपली अनेक जीवाभावाची माणसं गमावली, त्या सर्वांची आज आठवण येत आहे. त्यांचे स्मरण करतानाच आपण केलेल्या अभिष्टचिंतनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, असे ट्विटर सुप्रिया सुळे यांनी केलंय.