नव्या संधींसाठी युवकांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल; सायबर स्किल सेंटर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:38 IST2025-07-20T13:38:08+5:302025-07-20T13:38:36+5:30

कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, एआय, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा कोर्सेस या सेंटरमधून दिले जाणार आहेत.

Cyber security training for youth for new opportunities; Union Minister Piyush Goyal; Cyber Skill Center launched | नव्या संधींसाठी युवकांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल; सायबर स्किल सेंटर सुरू

नव्या संधींसाठी युवकांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल; सायबर स्किल सेंटर सुरू

मुंबई : सायबर सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहेच. याशिवाय युवकांना सुरक्षित भारताचे रक्षक बनण्यासाठीचे सक्षम माध्यम आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत तरुणांना नवी संधी मिळावी, यासाठी त्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. कांदिवली येथे डीएससीआय ॲडव्हान्स्ड सायबर स्किल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यूपीआय पेमेंटचा वापर सर्व गटांतील व्यक्तींकडून केला जात आहे. तंत्रज्ञानामुळे ही समानता निर्माण केली आहे. भारताच्या विकासात तरुणांचे योगदान असावे, यासाठी त्यांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज करून रोजगार मिळावा. त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. उत्तर मुंबई व परिसरातील १०,००० हून अधिक युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी सेंटरमुळे प्राप्त झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, एआय, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा कोर्सेस या सेंटरमधून दिले जाणार आहेत. विविध उद्योगांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व प्लेसमेंट उपलब्ध करून
द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘डीएससीआय’चे सीईओ विनायक गोडसे, किंद्रिल इंडिया प्रेसिडेंट लिंगराजू सावकार, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर या वेळी उपस्थित होते.

Web Title: Cyber security training for youth for new opportunities; Union Minister Piyush Goyal; Cyber Skill Center launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.