लॉकडाऊनच्या काळात सायबरचे गुन्हे 300 पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:26 IST2020-04-28T19:17:52+5:302020-04-28T19:26:33+5:30
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे गुन्हे 300 पार
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३०१ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक ,फेसबुक,ट्विटरवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या ३०१गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र आहेत.त्यामध्ये बीड २८, पुणे ग्रामीण २४, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १२, नाशिक शहर ११, जालना ११, नाशिक ग्रामीण १०, बुलढाणा १०, लातूर ९, सातारा ९, नांदेड ९, ठाणे शहर ८,परभणी ७, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६, हिंगोली ६,नागपूर शहर ६, पालघर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२४ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आले. titktok विडिओ शेअर प्रकरणी ९ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १०० आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
ठाणे शहरांतर्गत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे ,त्यामुळे ठाणे शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ८ वर गेली आहे.सदर गुन्ह्यात कोणीतरी फिर्यादीच्या मुलास कोरोनाची लागण झाली आहे,व त्यामुळे त्यांस घेऊन गेले आहेत ,तसेच फिर्यादीच्या भावांना देखील लागण झाली आहे,
त्यामुळे कोणीही फिर्यादीच्या दुकानातून मटण खरेदी करू नये अशा आशयाचे मेसेज व्हाट्सअँपद्वारे पसरवून फिर्यादी विरोधात अफवा पसरवली होती .