Join us

अवकाळीचे संकट; पंचनामे वाऱ्यावर, राज्यात गारपीटीने पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 06:36 IST

पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी कर्मचारी संपावर गेल्याने ते कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात खान्देश आणि मराठवाड्याच्या काही भागात झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने पिकांना हानी पोहोचली आहे. दरम्यान, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला असल्याने अवकाळीच्या संकटात पंचनामे वाऱ्यावर पडले आहेत. 

विदर्भातही पावसाच्या सरी कोसळल्या असून अकोला जिल्ह्यात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप गुरुवारी पहाटेपर्यंत होती. मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात गारांसह पाऊस झाला असून मार्च महिन्यापासून सहा हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोल्हापूर, सातारा पुण्यातही पावसाने हजेरी लावली असून सांगली जिल्ह्यात नुकसान झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पाऊसशेतकरी