coronavirus: Vijay Vadettiwar Says, "Death toll in Maharashtra if not locked down, to avoid this ...", | coronavirus: "लॉकडाऊन केला नाहीतर महाराष्ट्रात मृत्यूंचा खच पडेल, हे टाळायचे असल्यास...’’

coronavirus: "लॉकडाऊन केला नाहीतर महाराष्ट्रात मृत्यूंचा खच पडेल, हे टाळायचे असल्यास...’’

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावाला ब्रेक लावण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनवरून राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. (Vijay Vadettiwar Says, "Death toll in Maharashtra if not locked down, to avoid this ...",)

कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करत आहेत. मात्र मला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा वाटतोय. तसेच राज्यात कडक लॉकडाऊन न केल्यास आणि लोक भीती न बाळगता घराबाहेर पडत राहिल्यास राज्यात मृत्यूंचा खच पडेल. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी महाराष्ट्रात ६३ हजार २९४ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ०७ हजार २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

महाराष्ट्राप्रमाणे देशातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण सापडले आहेत. तर ७५ हजार ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Vijay Vadettiwar Says, "Death toll in Maharashtra if not locked down, to avoid this ...",

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.