Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य

By प्रविण मरगळे | Published: October 1, 2020 05:38 PM2020-10-01T17:38:29+5:302020-10-01T17:40:35+5:30

Coronavirus, Unlock 5, Multiplex & Theaters News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत चर्चा करणार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

Coronavirus, Unlock 5 Cinemas and theaters will start Soon, The Thackeray government is positive | Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Next
ठळक मुद्देदसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते.नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत लवकरच निर्णय घेऊ थिएटर्स सुरु राहण्याबाबतचे लायसन्स, वेगवेगळया परवानग्या यासारखे विषय प्राधान्याने सोडविण्यावर भर

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आलं होतं, त्यानंतर आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यातच बुधवारी ठाकरे सरकारने अनलॉक ५ ची नियमावली जाहीर केली, यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी दिली, मात्र जवळपास सहा महिन्यांपासून राज्यातील सिनेमागृहे, नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे, नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहे असं त्यांनी सांगितले. मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशन समवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने राज्यातील सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन/मल्टिप्लेक्स/ नाटयगृहे/फिल्म स्टुडिओ) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या राज्यात अनलॉक ५ चा टप्पा सुरु आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सिनेमागृहे/नाटयगृहे मात्र बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. येणारा काळ हा सिनेमागृहे सुरु करण्यास चांगला असून सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

थिएटर्स मालकांना वेगवेगळया समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद असल्याने थिएटर्स मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना येत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. थिएटर्स सुरु राहण्याबाबतचे लायसन्स, वेगवेगळया परवानग्या यासारखे विषय प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल असं आश्वासन सरकारने थिएटर्स ओनर्स यांना दिले.

यावेळी थिएटर्स ओनर्स यांनी बंद पडत असेलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स, सिंगल स्क्रिन थिएटर्स चालविताना येत असलेल्या अडचणी, थिएटर्स सुरु राहण्याबाबत देण्यात येणारे लायसेन्स, वीज बिल, मालमत्ता कर, विविध परवाने याबाबत येत असलेल्या समस्या मांडल्या. बैठकीला सिंगल स्क्रिन ओनर्स पैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, सेंट्रल सिनेमाचे शरद जोशी, कस्तुरबा सिनेमाचे निमिश सोमय्या, न्यू शिरीनचे विराफ वच्छा, आशा सिनेमाचे तेजस करंदीकर तर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे दिपक अशेर, मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्सचे आयनॉक्सचे अलोक टंडन, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, सिनेपॉलिसचे देवांद संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, युएफओचे कपिल अग्रवाल, राहूल हसकर, राम निधानी आदी उपस्थित होते.

Read in English

Web Title: Coronavirus, Unlock 5 Cinemas and theaters will start Soon, The Thackeray government is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.