Join us

Coronavirus : मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 15:15 IST

Coronavirus :  दादर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा कोरोनाशी झुंज देताना निधन झाले आहे. मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे हा तेरावा बळी आहे.

ठळक मुद्देदादर पोलीस ठाण्याचे ५४ वर्षीय पोलीस हवालदार हे वरळी कोळी वाडा येथे रेड झोनमध्ये दादर-पिटर 1 मोबाईल गाडीवर बंदोबस्ताकरिता कर्तव्यावर होते.२४ मे रोजी पहाटे त्यांची तब्येत बिघडल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नायर रूग्णालय येथे वॉर्ड नं.18 मध्ये दाखल करण्यात आले होते.

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशभरात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस खंबीरपणे सामोरे जात आहे. त्यातच अनेक डॉक्टर आणि पोलिसांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला आहे. दादर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा कोरोनाशी झुंज देताना निधन झाले आहे. मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे हा तेरावा बळी आहे.दादर पोलीस ठाण्याचे ५४ वर्षीय पोलीस हवालदार हे वरळी कोळी वाडा येथे रेड झोनमध्ये दादर-पिटर 1 मोबाईल गाडीवर बंदोबस्ताकरिता कर्तव्यावर होते. या ठिकाणी बंदोबस्त करत असताना त्यांना थंडी ताप येऊ लागले होते म्हणून त्यांची २० मे रोजी कोविड टेस्ट केली असता त्यांचा २२ मे रोजी पॉजिटीव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्यांना मरोळ पी.टी.एस. येथे दाखल केले. त्यांना तेथे व्यवस्थीत न वाटल्याने त्यांना २३ मे रोजी वरळी येथील एन.एस.सी.आय. क्लब येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु २४ मे रोजी पहाटे त्यांची तब्येत बिघडल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नायर रूग्णालय येथे वॉर्ड नं.18 मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २६ मे रोजी त्यांनी मोबाईल फोनव्दारे त्यांना जास्त त्रास होत असल्याचे त्यांनी कळविले. त्यामुळे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त जी/दक्षिण यांना विनंती करून नायर रुग्णालयातील डाॅ.सारीखा यांना सतत संपर्क करून पोलीस हवालदार यांना आय.सी.यु.मध्ये दाखल केले. सायंकाळी पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी कळविले.

 

हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

 

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

 

आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण

 

खळबळजनक! गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामुंबईमृत्यू