Join us

Coronavirus:  कोरोना योद्धांचा एसटीच्या मोफत प्रवासासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 21:19 IST

लॉकडाऊन काळात  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. याकर्मचाऱ्यांना ने- आन करण्यासाठी एसटीच्या विशेष  फेऱ्या  मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत होत्या.

मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धांचा मान दिला गेला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य सरकारच्या कर्मचारी, मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ही सुविधा शुक्रवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे. 

लॉकडाऊन काळात  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. याकर्मचाऱ्यांना ने- आन करण्यासाठी एसटीच्या विशेष  फेऱ्या  मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत आहेत. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून कामावर जात असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना मोफत प्रवास देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महानगरपालिका आणि राज्य शासनाने एसटी महामंडळाला आगाऊ रक्कम अदा केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रवासामध्ये तिकीट आकारण्यात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच वाहकांकडून या कर्मचाऱ्यांना तिकीट देऊन तिकीटच्या मागे त्याची संपूर्ण माहिती लिहून घेतली जात होती. मात्र ही सुविधा शुक्रवार पासून बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला होता. परंतु, महागरपालिकेने याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

मुंबई महानगरपालिकेने एसटीमध्ये महापालिका कर्मचार्यांनासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ती सुविधा शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेने यावर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास मिळणार आहे. ही मुदतवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील लागू झाली आहे. - राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक

टॅग्स :एसटीडॉक्टरपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस