Join us  

Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 2:34 PM

Coronavirus: कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे दहावीचा एक पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे.सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्चनंतर होणार.

मुंबई - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून, मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे दहावीचा एक पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (21 मार्च) दहावीच्या एका विषयाचा पेपर पुढे ढकलला असल्याची माहिती दिली आहे. दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्चनंतर होणार म्हणजेच 31 मार्चनंतर पेपरची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता दहावीच्या एका विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. 

वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी 'पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नववी आणि अकरावीच्या परिक्षेचा निर्णय 15 एप्रिलनंतर होईल आणि दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार आहे. याशिवाय, दहावी वगळता इतर सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत' अशी माहिती त्यांनी दिली होती.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं असून, शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, जमल्यास कमीत कमी वापरावा असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 52वरून 63वर; मुंबईत 10 नव्या रुग्णांची नोंद

 Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय

Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यापरीक्षामहाराष्ट्रवर्षा गायकवाडदहावी