coronavirus: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:29 IST2020-06-09T17:10:03+5:302020-06-09T17:29:02+5:30
सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाढत्या संक्रमाणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

coronavirus: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन
मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह मुंबईमध्ये सुरू असलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाढत्या संक्रमाणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी उच्चायुक्त शिरीश दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिरीश दीक्षित हे मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. तर १७०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत मुंबईतील २२ हजार ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला मुंबईमध्ये कोरोनाचे एकूण २६ हजार ३४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या