Join us  

Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 7:08 PM

१४५ ICU बेड्सचा समावेश, रुग्णांच्या उपचाराचा खर्चही रिलायन्स फाऊंडेशन उचलणार. रिलायन्स कडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

ठळक मुद्दे१४५ ICU बेड्सचा समावेश, रुग्णांच्या उपचाराचा खर्चही रिलायन्स फाऊंडेशन उचलणाररिलायन्स कडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक उद्योजकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आता रिलायन्स फाऊंडेशननं (Reliance Foundation) कोरोनाच्या महासाथीत आरोग्य सुविधांवर येत असलेला ताण पाहता वैद्यकीय मोहीम जलद केल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. रिलायन्स फाऊंडेशननं एनएससीआय, सेव्हेन हिल्स रुग्णालय, ट्रायडेंट आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जवळपास ८७५ बेड्सची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १४५ आयसीयू बेड्सदेखील आहेत. या ठिकाणी रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये आयसीयू बेड्स. व्हेंटिलेटर्स, आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. एका निवेदनानुसार एनएससीआयमधील सर एनएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात ६५० बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. तसंच रिलायन्स फाऊंडेशन १०० नव्या आयसीयू बेड्सची व्यवस्था करणार आहे. १५ मे पासून टप्प्याटप्प्यानं ते सुरू करण्यात येतील. रिलायन्स फाऊंडेशन सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी ६५० बेड्सची व्यवस्था करणार आहे. तसंच रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रुपात ५०० जणांची दिवसरात्र सेवा घेतली जाणार असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठाकोरोनाच्या सर्व रुग्णांवर एनएससीआय आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातील, असंही निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे. रिलायन्स फाऊंडेशन १४५ आयसीयू बेड्ससह सुमारे ८७५ बेडचे व्यवस्थापन करेल, अशी माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितलं. रिलायन्स फाउंडेशन नेहमीच देशाच्या सेवेत अग्रस्थानी राहिलम आहे आणि महासाथीच्या विरूद्ध भारताच्या संघर्षात योगदान देणं आपलं कर्तव्य आहे. रिलायन्स सध्या गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दमण, दीव आणि नगर हवेलीला दररोज ७०० टन ऑक्सिजन पुरवत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :रिलायन्सकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईनीता अंबानीमुकेश अंबानीऑक्सिजनमहाराष्ट्रगुजरात