Join us  

Coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी धावून आली लालपरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 2:42 AM

अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाºयांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची सेवा एसटीच्या बस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, तरी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाची लालपरी व बेस्टची बस धावत आहे.राज्य सरकारने एसटी महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणा?्या कर्मचा?्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निदेर्शानुसार एसटीने मंत्रांलयीन कर्मचा?्यांची ने - आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण (सकाळी ८:००, ८:१५) येथून; पश्?चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसची सोय केली आहे.बेस्टच्या वतीने बोरीवली स्टेशन -मंत्रालय (८:००,८:३०), शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय (८:३०,९:००) पनवेल एसटी स्टँड - मंत्रालय (७:३०,८:३०) ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय (८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय (८:३०,९:००) पि.के.खुराणा चौक वरळी - मंत्रालय (८:४५,९:००) येथून बसेस सुटतील. महापालिका, शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणा?्या लोकांची ने-आण करण्यासाठी पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून आणि बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटीच्या बस दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. या बस डोंबिवली-ठाणे, पनवेल-दादर, पालघर-बोरिवली, विरार- बोरिवली, टिटवाळा-ठाणे, आसनगाव- ठाणे, कल्याण- ठाणे, कल्याण -दादर, बदलापूर -ठाणे नालासोपारा- बोरिवली या माग?वर धावत आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाºयांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची सेवा एसटीच्या बस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, तरी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसएसटीबेस्ट