Join us  

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिला मदतीचा हात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:56 PM

Coronavirus : पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २ हजार मास्क तयार केले आहेत. हे मास्क रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत.  

मुंबई - मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचारी सामान्य नागरिक, रेल्वे पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मास्क बनविणे, सॅनिटायझर, हँडग्लोजचे वाटप करणे ही सेवा करण्यासाठी रेल्वे कर्मचारी सरसावले आहेत.  

कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामधील कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा करण्यासाठी महिला तिकीट तपासक स्वतः मास्क शिवत आहेत. स्टेशन मास्टर रेल्वे पोलिसांना, सफाई कामगारांना सॅनिटायझर, हँडग्लोजचे वाटप करत आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २ हजार मास्क तयार केले आहेत. हे मास्क रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. यासह रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप सुरू आहे. 

पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका " src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2020-04-01-at-4.42.59-pm_202004397503.jpeg"/>

देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी आणि स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप सुरू आहे. सामाजिक संस्थाच्या सहकार्याने आतापर्यंत ५ हजार मास्क, २ हजार सॅनिटायझर बाटल्या, १ हजार हँडग्लोजचे वाटप सुरू आहे. पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी हे वाटप सुरू आहे.  शिवडी, वडाळा, किंग्ज सर्कल, धारावी येथे मास्क, सॅनिटायझर वाटप केले आहे. 

- एन. के. सिन्हा, स्टेशन मास्टर, शिवडी 

मास्क, सॅनिटायझरचे वाटप सुरू आहे. यासह स्थानकावर अडकून राहिलेल्या प्रवाशांना, कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना अन्नदान करत आहोत. सीएसएमटी, परळ, भायखळा, माझगाव येथील सुमारे ५०० जणांना मदतकार्य केले जात आहे, असे वाणिज्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'कोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे मात्र अंमलबजावणीची पद्धत चुकीची' 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू

Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यापश्चिम रेल्वेरेल्वेभारत