CoronaVirus News : राणीची बाग ३० एप्रिलपर्यंत बंद; नूतनीकरणाचे काम सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:13 PM2021-04-05T23:13:59+5:302021-04-05T23:14:45+5:30

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती.

CoronaVirus News: Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo (rani baug) closed till April 30; Renovation work will continue | CoronaVirus News : राणीची बाग ३० एप्रिलपर्यंत बंद; नूतनीकरणाचे काम सुरू राहणार 

CoronaVirus News : राणीची बाग ३० एप्रिलपर्यंत बंद; नूतनीकरणाचे काम सुरू राहणार 

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने सोमवारपासून मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या काळात राणी बागेच्या नूतनीकरणाचे काम केवळ सुरू राहणार आहे. (CoronaVirus News: Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo (rani baug) closed till April 30; Renovation work will continue)

मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार नियंत्रण आल्याने १५ फेब्रुवारीपासून हे  प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने राणी बाग महिनाभर बंद करण्यात आली आहे

लॉकडाऊन आधी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १२ हजारांपर्यंत पोहोचत होती. मात्र, गेल्या रविवारी अडीच ते तीन हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. पर्यटकांची संख्या एक लाख ८० हजारांवरून कमी होऊन एक लाखापर्यंत आली आहे. तर महसुलातही घट होऊन १५ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत या महिनाभराच्या कालावधीत केवळ ४१ लाखांचा महसूल जमा झाला.  

नूतनीकरणाचे काम सुरू राहणार 
उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एक महिना बंद असले तरी नूतनीकरणाची कामे या काळात सुरूच राहणार आहे. या काळात विविध पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 
 

Web Title: CoronaVirus News: Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo (rani baug) closed till April 30; Renovation work will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.