CoronaVirus News: Still questioning domestic airlines; The difficulties of many states | CoronaVirus News: देशांतर्गत विमानसेवेवर अद्याप प्रश्नचिन्ह; अनेक राज्यांच्या अडचणी

CoronaVirus News: देशांतर्गत विमानसेवेवर अद्याप प्रश्नचिन्ह; अनेक राज्यांच्या अडचणी

मुंबई : देशांतर्गत प्रवासी विमानसेवा २५ मेपासून सुरू करण्यात येईल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली असली तरी महाराष्ट्रात मात्र ही सेवा सुरू न करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांनीही वेगवेगळे आक्षेप नोंदवल्यामुळे देशांतर्गत विमानसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले, की राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 

सर्वच राज्यांना भीती

विमानसेवा सुरू केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती जवळपास सर्वच राज्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विमानाने येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक असेल, असे कर्नाटक, जम्मू व काश्मीर, छत्तीसगड, सिक्कीम, पंजाब आदी राज्यांनी स्पष्ट केले आहे.
हे क्वारंटाईन ७ ते १४ दिवस असू शकेल. गुजरातही तसाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आम्हाला विचारात व विश्वासात न घेता केंद्राने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी राज्यांची तक्रार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Still questioning domestic airlines; The difficulties of many states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.