Coronavirus News : ...म्हणे कोरोना रुग्णाचे अवयव केले गायब!, व्हिडीओमुळे गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 07:15 AM2020-07-16T07:15:12+5:302020-07-16T07:15:32+5:30

हंगामा करणाऱ्या कोळीबांधवांची पोलीस समजूत काढत असतानाचा हा व्हिडीओ होता.

Coronavirus News: ... says Corona patient's organs disappear !, Confusion over video | Coronavirus News : ...म्हणे कोरोना रुग्णाचे अवयव केले गायब!, व्हिडीओमुळे गोंधळ

Coronavirus News : ...म्हणे कोरोना रुग्णाचे अवयव केले गायब!, व्हिडीओमुळे गोंधळ

Next

मुंबई : सोशल मीडियावर कोळीबांधव हंगामा करत असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोरोना रुग्णाचे अवयव काढून घेण्यात आल्याचे त्याच्या सोबत असलेल्या मेसेजमध्ये म्हणण्यात आले होते. त्यात काही तथ्य नसून तो फेक असल्याचे गोराई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
हंगामा करणाऱ्या कोळीबांधवांची पोलीस समजूत काढत असतानाचा हा व्हिडीओ होता. त्यासोबत असलेल्या मेसेजमध्ये ‘एका कोरोना रुग्णाचा मृतदेह पिशवीत बंद करून नातेवाइकांना देण्यात आला, त्यांनी तो उघडून पहिला तेव्हा सदर व्यक्तीचे काही अवयवच नाहीसे असल्याचे त्यांना दिसले,’ असे त्यात नमूद करत आता कोरोनाच्या नावाखाली हा नवीन स्कॅम सुरू असल्याचेही म्हणण्यात आले होते.
अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा मेसेज व्हायरल झाला. ‘लोकमत’च्या हाती हा व्हिडीओ लागल्यावर तातडीने प्रतिनिधीने याप्रकरणी गोराई पोलिसांना विचारणा केली. तेव्हा तो ‘फेक’ असल्याचे एका अधिकाºयाने स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोराईच्या मनोरी गावामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्याच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी आले होते. त्यांना पाहून स्थानिकांनी हंगामा सुरू केला. याचा व्हिडीओ कोणी तरी शूट करून तो चुकीचा मेसेज देत व्हायरल केला.
मुळात कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात नाही याबाबत संबंधित व्यक्तीला माहिती नसावी. ‘आम्ही इथेच जन्माला आलो आणि इथेच मरणार, आम्ही कुठेही जाणार नाही,’ असे ते घोळक्याने जमा होत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगत होते. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थनिकांची समजूत काढत त्यांना परत पाठविले.

कर्मचारी आले होते क्वारंटाइन करण्यासाठी
अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा मेसेज व्हायरल झाला. ‘लोकमत’च्या हाती हा व्हिडीओ लागल्यावर तातडीने प्रतिनिधीने याप्रकरणी गोराई पोलिसांना विचारणा केली. तेव्हा तो ‘फेक’ असल्याचे एका अधिकाºयाने स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोराईच्या मनोरी गावामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी आले होते.

Web Title: Coronavirus News: ... says Corona patient's organs disappear !, Confusion over video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.