CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:56 IST2020-11-14T01:39:59+5:302020-11-14T06:56:49+5:30
राज्यभरात आजघडीला एकूण ८४ हजार ८२ रुग्ण आहेत.

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात शुक्रवारी ४ हजार १३२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत बाधित झालेल्या नागरिकांची संख्या १७ लाख ४० हजार ४६१ झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात ४ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १६ लाख ९ हजार ६०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यभरात आजघडीला एकूण ८४ हजार ८२ रुग्ण आहेत.
याशिवाय, आज राज्यभरात १२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.६३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ४५ हजार ८०९ नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९७ लाख २२ हजार ९६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ४० हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ८ लाख १० हजार २६७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६ हजार १७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.