CoronaVirus News: आजपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 21:07 IST2020-06-28T21:06:50+5:302020-06-28T21:07:02+5:30
कोराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी २२ मार्चपासुन देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद आहे.

CoronaVirus News: आजपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट मिळणार
मुंबई: देशभरातील २०० विशेष ट्रेन आणि देशातील निवडक १५ मार्गावरून राजधानी ट्रेन धावत आहे. या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी २२ मार्चपासुन देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद आहे. त्यानंतर सर्व सामान्य प्रवाशांसाठी देशातील निवडक १५ मार्गावर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासुन २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. मात्र या ट्रेनचे तत्काळ तिकीट रेल्वेकडून दिले जात नव्हते. मात्र आता २९ जूनपासून हि सुविधा प्रवाशांसाठी सुरु झाली आहे.