CoronaVirus News : कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोनशे दिवसांवर, राज्य सरकारसह पालिकेच्या चतु:सूत्रीला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 03:26 AM2020-11-07T03:26:07+5:302020-11-07T06:30:20+5:30

CoronaVirus News: २० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला.

CoronaVirus News: Doubling period of corona patients in 200 days, success with state government | CoronaVirus News : कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोनशे दिवसांवर, राज्य सरकारसह पालिकेच्या चतु:सूत्रीला यश

CoronaVirus News : कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोनशे दिवसांवर, राज्य सरकारसह पालिकेच्या चतु:सूत्रीला यश

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळत आहे. जागरुक मुंबईकर आणि पालिकेने यासाठी केलेल्या उपाययाेेजना उपयोगी ठरत आहेत. त्यामुळेच मुंबईत सुरुवातीला केवळ ८ दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा असलेला कालावधी आता तब्बल २०८ दिवसांवर पोहोचला आहे.
चेस द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या भेटी, नागरिकांची पडताळणी, पोलिसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधविषयक बाबी आणि मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.
२० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला. पालिकेच्या २४ विभागांपैकी ४ विभागांनी ३०० दिवसांचा, ११ विभागांनी २०० दिवसांचा, ६ विभागांनी १७५ दिवसांचा तर उर्वरित ३ विभागांनीही १५० दिवसांचा टप्पा ओलांडलेला.

विभागनिहाय कालावधी
- ३०० दिवसांपेक्षा जास्त ४ विभाग
(जी उत्तर ३५१ दिवस, एफ दक्षिण ३१६ दिवस, ए ३०८ दिवस, सी ३०६ दिवस)
- २०० दिवसांपेक्षा जास्त ११ विभाग (जी दक्षिण २८३ दिवस, एल २४५ दिवस, ई २४२ दिवस, एस २३८ दिवस, डी २३३ दिवस, एफ उत्तर २१३ दिवस, एम पूर्व आणि के पूर्व २०७ दिवस, एच पश्चिम २०६ दिवस, एच पूर्व २०३ दिवस आणि के पश्चिम २०० दिवस)

असे ओलांडले टप्पे
१०० दिवस - २० ऑक्टोबर
१२६ दिवस - २४ ऑक्टोबर
१५० दिवस - २९ ऑक्टोबर
२०८ दिवस - ५ नोव्हेंबर

Web Title: CoronaVirus News: Doubling period of corona patients in 200 days, success with state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.