CoronaVirus News: 'Corona kills another policeman | CoronaVirus News : 'काेरोनामुळे आणखी एका पोलिसाचा बळी

CoronaVirus News : 'काेरोनामुळे आणखी एका पोलिसाचा बळी

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गुरुवारी आणखी एका पोलिसाचा बळी घेतला. अखलाख अहमद पटेल (५६) असे त्यांचे नाव असून ते डी.एन. नगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते.
पटेल यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल, २०२१ रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. उपचारासाठी त्यांना  बीएसइएस रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. १२ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. १५ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांची ऑक्सिजन क्षमता ७२ टक्क्यांवर आल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र एकच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. ते वांद्रे पोलीस कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांच्या मागे भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर पत्नीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 'Corona kills another policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.