CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात ६४ मृत्यू, १ हजार ३८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:45 AM2020-07-20T01:45:28+5:302020-07-20T06:17:01+5:30

शहर-उपनगरात नोंद झालेल्या ६४ मृत्यूंमध्ये ५१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

CoronaVirus News: 64 deaths, 1,038 patients in Mumbai in a day | CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात ६४ मृत्यू, १ हजार ३८ रुग्ण

CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात ६४ मृत्यू, १ हजार ३८ रुग्ण

Next

मुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार ३८ रुग्ण आणि ६४ मृत्यू झाले आहेत. शहर-उपनगरात एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार ३८८ इतकी असून मृतांचा आकडा ५ हजार ७१४ झाला आहे. सध्या २३ हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहर-उपनगरात नोंद झालेल्या ६४ मृत्यूंमध्ये ५१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३९ रुग्ण पुरुष व २५ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ३६ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. १३ जुलै ते १८ जुलैपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.२६ टक्के आहे. १८ जुलैपर्यंत मुंबईत ४ लाख ३३ हजार २२७ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ५५ दिवस झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ हजार १६५ रुग्ण कोविडमुक्त झाले.

बीआयटी चाळींत कोरोनाचे सावट

शहर-उपनगरात बीआयटी चाळी आणि त्या परिसरात ५११ कोरोना रुग्ण आढळले आहेत. माझगाव बीआयटी चाळींमध्ये १२७ रुग्ण आढळले आहेत. ई विभागातील माझगाव येथील १२ क्रमांकाच्या बीआयटी चाळीत तब्बल ७६ रुग्ण आढळले आहेत. त्यात १२ क्रमांकाच्या चाळीत ७६ रुग्ण आहेत. वाडीबंदर माझगाव बीआयटी परिसरात ८३ आणि कामाठीपुरा बीआयटीमध्ये ४९ रुग्ण आढळले आहेत. तर, भायखळा बीआयटी चाळी आणि परिसरात ६४ रुग्ण आढळले आहेत.

मुंबई सेंट्रल, चिराबाजार, परळ बीआयटी या चाळीतील कोरोना रुग्णांची संख्या आठ दिवसांत वाढली आहे. मुंबई सेंट्रल बीआयटी संकुल आणि परिसरात ९ जुलै रोजी ४१ रुग्ण होते, तर १७ जुलै रोजी ४५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर परळ येथील बीआयटी चाळींत ४५ रुग्ण होते, तेथे आता ५४ रुग्णांची नोंद झाली.

Web Title: CoronaVirus News: 64 deaths, 1,038 patients in Mumbai in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.