CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे दिवसभरात ३९ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:34 IST2020-05-25T01:46:21+5:302020-05-25T06:34:02+5:30
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी माहीम येथे नव्याने ११ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे दिवसभरात ३९ बळी
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला पडलेला कोरोनाचा विळखा वाढतच आहे. रविवारी मुंबईत कोरोनामुळे ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे. ३९ रुग्णांपैकी २४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी माहीम येथे नव्याने ११ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३१७ आहे. दादर येथे ९ रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांचा आकडा २१९ झाला आहे. धारावीत एकूण आकडा १ हजार ५४१ आहे.
पालिकेच्या प्रत्येक विभागात कोरोनाचा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीसह रुग्ण वाढीच्या सरासरी दरावर देखील लक्ष ठेवले जात आहे. रुग्ण वाढीच्या सरासरी दरामुळे, एखाद्या विशिष्ट ठिकाणी जिथे रुग्णसंख्या कमी आहे. तेथे रुग्णांची वाढ होत असल्यास तातडीने त्याची दखल घेतली जात आहे. रुग्णवाढीचा दर ८ टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्यास प्रतिबंधित क्षेत्राचे काटेकोरपने पालन केले जाते.
रविवारचा अहवाल
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ८०८, बाधित रुग्ण १ हजार ७२५, बरे झालेले रुग्ण ५९८, मृत रुग्ण ३९.