coronavirus : मुंबई-पुण्यात कर्मचाऱ्यांची पाच टक्केच उपस्थिती राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 23:31 IST2020-04-22T23:20:56+5:302020-04-22T23:31:41+5:30
यापूर्वी दहा टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती.राज्यातील अन्य भागांमध्ये मात्र दहा टक्के कर्मचारी दररोज उपस्थित राहतील.

coronavirus : मुंबई-पुण्यात कर्मचाऱ्यांची पाच टक्केच उपस्थिती राहणार
मुंबई - मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र ( एमएमआर) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (पीएमआर) शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्केच कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दहा टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती.राज्यातील अन्य भागांमध्ये मात्र दहा टक्के कर्मचारी दररोज उपस्थित राहतील.