Coronavirus : मालाडमध्ये २६६ 'होम क्वॉरंटाइन' ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:55 AM2020-03-29T11:55:34+5:302020-03-29T12:12:44+5:30

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Coronavirus Mumbai 266 'home quarantines' were cured In Malad SSS | Coronavirus : मालाडमध्ये २६६ 'होम क्वॉरंटाइन' ठणठणीत

Coronavirus : मालाडमध्ये २६६ 'होम क्वॉरंटाइन' ठणठणीत

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - मालाडच्या पी उत्तर भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात त्यांना पहिले यश मिळाले आहे.  त्यानुसार याविभागात असलेल्या एकूण क्वॉरंटाइन लोकांपैकी २६६ जणांनी चौदा दिवसांचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला असुन त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले आहे.

मालाड परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसरात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. सध्या कोरोना ज्या वेगाने सर्वत्र पसरत आहे त्यानुसार झोपड्यामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यानुसार या सगळ्याला रोखण्यासाठी पालिकेच्या पी उत्तर विभाग प्रयत्न करत आहे. पालिका अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, पी उत्तर विभागात  ३३७ लोकांना क्वॉरंटाइन ठेवण्यात आले होते. स्थानिक पोलीस आणि पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या क्वॉरंटाइन लोकांची योग्य ती काळजी घेतली. त्यामुळे २६६ लोकांना चौदा दिवसांचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश मिळाले. डॉक्टरने त्यांची तपासणी करत ते ठणठणीत असल्याचे घोषित केले आहे. उर्वरित ७१ लोकांमध्येही अद्याप तर कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळलेले नसून ते सर्व देखील लवकरच हा कालावधी पुर्ण करतील असा विश्वास संबंधित अधिकाऱ्याकडून व्यक्त केला गेला. त्यामुळे झोपडपट्टीपासून कोरोनाला लांब ठेवण्याचे मोठे आव्हान पालिका आणि संबंधित विभागाकडे आहे.



'आव्हान पेलताना सहकाऱ्यांची मदत मोठी'!

'कोरोनाला अटकाव करणे एक मोठे आव्हान आहे, विशेषतः जेव्हा आपण झोपडपट्टी परिसराचा विचार करतो. मात्र आमच्या सोबत आमचे सर्व कर्मचारी, आरोग्य खाते, डॉक्टर दिवसरात्र मेहनत घेत आहेत. स्थानिक परिसरात नगरसेवक आणि अन्य मंडळीमार्फत आवश्यक ते संपर्क क्रमांक लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. डॉक्टराना वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत,  जेणेकरून गरजेच्या ठिकाणी त्यांना सहज पोहोचता येईल. एकूणच काय तर सहकाऱ्यांच्या या मदतीमुळेच कोरोनाचे आव्हान पेलताना आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे.

(संजोग कबरे - सहाय्यक आयुक्त, पी उत्तर विभाग )

'मोकळ्या इमारतीची यादी होतेय तयार'!

मालाड परिसरात असलेल्या म्हाडाच्या रिकाम्या इमारती तसेच पालिका शाळांना क्वॉरंटाइन कक्ष बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याबाबत डिजास्टर मॅनेजमेंट, पालिका अधिकारी आणि संबंधितांची एक बैठक पार पडली असून अशा ठिकाणाची यादी तयार करण्यात येत आहे. जेणेकरून वेळीच अशा विभागात कोरोनाला अडवून लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू

Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

 

Web Title: Coronavirus Mumbai 266 'home quarantines' were cured In Malad SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.