Coronavirus : वेसावे गावात मास्क लावा जनजागृती अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:34 PM2021-02-21T14:34:45+5:302021-02-21T14:35:06+5:30

Coronavirus : गेल्या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात वेसावे गाव आणि परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट झाला होता.आता पुन्हा मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे.

Coronavirus : Mask Lava Janajagruti Abhiyan in Vesave village | Coronavirus : वेसावे गावात मास्क लावा जनजागृती अभियान

Coronavirus : वेसावे गावात मास्क लावा जनजागृती अभियान

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई - गेल्या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात वेसावे गाव आणि परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट झाला होता.आता पुन्हा मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. नागरिक कोरोनाला अटकाव करणारे मास्क घालण्यात बेफिकीर असतात.तोंडावरचे मास्क हनुवटीवर येतात.
 त्यामुळे प्रभाग क्रमांक 59 मधील नागरिकांमध्ये मास्क घालण्यासाठी जनजागृती होण्यासाठी शिवसेना शाखा क्र ५९ च्या वतीने मास्क लावा जनजागृती अभियान नुकतेच राबवण्यात आले. अश्या प्रकारचा पश्चिम उपनगरातील हा पहिला उपक्रम असल्याचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी सांगितले.

स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतिश परब, महिला शाखासंघटक बेबी पाटील आणि महापालिका के पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये "मास्क" वापराविषयी जनजागृती अभियान नुकतेच राबवण्यात आले. यामध्ये उपस्थितीत मान्यवरांनी जनतेला सरकारच्या त्रिसूत्री (मास्क लावणे, हात धुणे, अंतर राखणे) अभियानाचे महत्त्व पटवून दिले.

 खोजागल्ली सारख्या गजबजलेल्या वस्तीत स्वच्छतेचे महत्त्व जनतेमध्ये अधोरेखित करण्यासाठी उपविभागप्रमुख राजेश शेट्ये व महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले.

या अभियानात उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, बब्बू चौधरी, शंकर डांगळे,  आश्विनी पाटील, कांचन घाणेकर, युवा सेनेचे संदीप पडवळ, स्वप्निल शिवेकर , आणि महिला पुरूष गटप्रमुख आणि येथील नागरिक सहभागी झाले होते.
 

Web Title: Coronavirus : Mask Lava Janajagruti Abhiyan in Vesave village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.