Join us  

CoronaVirus लोकांनी झुंबड उडवली; मुंबईत दारूची दुकानं पुन्हा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 10:49 PM

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा नऊ हजाराहून अधिक आहे. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी तिसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविण्यात आला तरी राज्य शासनाने काही नियम शिथिल केले. विशेषतः मद्यविक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी रविवारपासून देण्यात आली होती. मात्र सोमवारी मुंबईतील सर्वच विभागांमध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर लोकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. यामुळे सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमाची पायमल्ली होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी खबरदारी म्हणून पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत यापुढे केवळ किराणा माल, अत्यावश्यक सेवा आणि औषध विक्रीचे दुकान सुरू राहतील, असे परिपत्रक काढले आहे. 

 

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा नऊ हजाराहून अधिक आहे. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी तिसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र सोमवारी या नियमात शिथिलता आणत घाऊक आणि किरकोळ मद्य विक्रीची दुकाने व कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या विभागात पाच दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, मद्य विक्रीची

दुकान सुरू ठेवल्यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी वाढल्याने इतक्या दिवसांपासून घेतलेली मेहनत वाया जाण्याची भीती आयुक्तांना वाटत आहे. लोकं शिस्त पाळत नसून एका ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता, अशी तक्रार पोलीस आणि विभाग कार्यालयातील अधिकार्‍यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

 

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मोठा असून अद्याप त्यात घट झालेली नाही. अशावेळी सोशल डिस्टन्स सिंगचे नियम मोडल्यास लॉक डाऊनमुळे आतापर्यंत थोपविण्यात आलेल्या या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे केवळ किरणामाल, अत्यावश्यक आणि औषध विक्रीची दुकाने सुरू राहतील, याची खबरदारी घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व २४ विभागाचे सहायक आयुक्त तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या...

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

...तर सिंधुदुर्ग रेड झोनमध्ये जाईल; नितेश राणे संतापले

CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी

चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिकादारूबंदी