Coronavirus IIT Bombay World Wide Help app for people SSS | Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार

Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार

मुंबई - लॉकडाऊनच्या परिस्थितीत हजारो लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत, त्यांना प्रत्येक ठिकाणाहून मदतही केली जात आहे. मात्र प्रत्येक गरजू व्यक्तिपर्यंत आवश्यक, हवी ती मदत पोहचत आहे असे नाही. गरजू व्यक्तींना नेमक्या कोणत्या ठिकाणी, काय मदत हवी हे जर व्यवस्थित कळू शकले तर ती आवश्यक मदत पोहचवण्यास आणखी सोपे होईल. याच पार्श्वभूमीवर प्राध्यापिका कामेश्वरी चेब्रालू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने वर्ल्ड वाईड हेल्प या व्यासपीठाच्या निर्मिती केली आहे. यामधून ज्या गरजू व्यक्तीला आवश्यकता आहे त्याचा, आणि विविध प्रकारची मदत करू शकणाऱ्या व्यक्ती, डॉक्टर्स, संघटना यांचा समन्वय साधला जाणार आहे. 

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अगदी माफक दरात आणि इतर कॉल सेंटर सुविधा पेक्षा अगदी चांगली सेवा या वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे पुरविण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या आयसीई विभागामार्फत देण्यात आली आहे. ज्या गरजू व्यक्तीला आवश्यकता आहे, त्याची निकड आणि मदत करणाऱ्या व्यक्तीची सेवा किंवा इतर मदत यांचा समन्वय फोन आणि मसेजेस या दोन्ही माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहेत. अगदी गावातल्या ठिकाणापासून ते शहरातील सहज पोहचू शकता येणाऱ्या ठिकाणी या सेवा पोहचविल्या जाणार आहेत. 

जेथे रुग्ण डॉक्टरपर्यंत पोहचू शकत नाही, किंवा पोहचण्यासाठी खूप प्रवास, वेळ खर्ची होणार आहे अशा ठिकाणी वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे संबंधित डॉक्टर आणि रुग्णांचा समन्वय साधला जाऊन व्हिडीओ किंवा फोनद्वारे त्यांना आवश्यक सुविधा , सल्ला आणि मार्गदर्शन केले जाऊ शकते. सरकारी योजना, कोरोना संबंधित आवश्यक मार्गदर्शन , काळजी घेण्यासाठी उपाय, किंवा लोकांच्या तक्रारी या वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे संबंधित लोकांना देता येऊ शकतात. अशा विविध प्रकारे मदत करणाऱ्या वर्ल्ड वाईड हेल्पची मदत घेण्यासाठी फक्त ते आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून घेण्याची गरज लागणार असून यामधून सोशल डिस्टसिंगचा नियम कायम पाळला जाणार आहे हे याचे वैशिष्ट्य आहे. 

वर्ल्ड वाईड हेल्पमधून मदत करणार करणाऱ्या संस्था, संघटना व्यक्ती बदलत राहणार असून निकड असलेली व्यक्ती किंवा मदत करणारी व्यक्ती ईच्छा असल्यास आपली ओळख निनावी ठेवू शकणार आहे. मात्र संबंधित व्यक्तींचे सर्व डिटेल्स मात्र वर्ल्ड वाईड हेल्पकडे सेव्ह करून ठेवले जाणार आहेत. लॉकडाऊनची परिस्थिती पाहता आयआयटी बॉम्बेचे हे एप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

 

Web Title: Coronavirus IIT Bombay World Wide Help app for people SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.