Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तातील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:38 IST

वाढदिवस असूनही  कुटुंबापासून दूर  आपले कर्तव्य करणाऱ्या  श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले.

मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख  काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही  कुटुंबापासून दूर  आपले कर्तव्य करणाऱ्या  श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले.  केवळ कौतुकच नव्हे तर  राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री,पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले.त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.  त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबई कडे मार्गस्थ झाले.

टॅग्स :अनिल देशमुखमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस