coronavirus: पर्यटन व्यवसायाला विशेष आर्थिक पॅकेज द्या, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:18 PM2020-05-07T12:18:03+5:302020-05-07T12:21:15+5:30

उन्हाळ्याच्या सुटीचे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. परंतु लॉकडाऊनमुळे हाच सीजन वाया गेला आहे.

coronavirus: Give special financial package to tourism business, Satyajit Tambe BKP | coronavirus: पर्यटन व्यवसायाला विशेष आर्थिक पॅकेज द्या, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

coronavirus: पर्यटन व्यवसायाला विशेष आर्थिक पॅकेज द्या, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला आहे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. परंतु लॉकडाऊनमुळे हाच सीजन वाया गेला आहेपर्यटन उद्योगाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे

मुंबई - लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला असल्याने ,पर्यटन क्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी, अशी मागणी  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.   उन्हाळ्याच्या सुटीचे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. परंतु लॉकडाऊनमुळे हाच सीजन वाया गेला आहे. तसेच भविष्यातील अनिश्चिततेनं या पर्यटन उद्योगाला ग्रासलं आहे. या उद्योगाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

  सत्यजीत तांबे यांनी या संदर्भात काळजी व्यक्त करतानाच पर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण वा विकास कामांसाठी  वार्षिक निधी  खर्च करू नये अशी सूचना देखील केली आहे.  त्यापेक्षा हा वार्षिक निधी पॅकेज म्हणून पर्यटन क्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा, अशी मागणी तांबे यांनी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Web Title: coronavirus: Give special financial package to tourism business, Satyajit Tambe BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.