CoronaVirus News: डॉक्टरचे कर्तव्य बजावल्याचे समाधान; वरळीच्या डोममधील यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:10 AM2020-06-18T04:10:13+5:302020-06-18T04:10:24+5:30

संपर्कविरहित रुग्णालयामुळे ‘कोविड’शी लढणे सोपे झाले

CoronaVirus doctor working in worli dome express Satisfaction | CoronaVirus News: डॉक्टरचे कर्तव्य बजावल्याचे समाधान; वरळीच्या डोममधील यशोगाथा

CoronaVirus News: डॉक्टरचे कर्तव्य बजावल्याचे समाधान; वरळीच्या डोममधील यशोगाथा

Next

मुंबई : कोरोनाचे जागतिक संकट असताना केवळ वयाच्या धास्तीमुळे घरात बसून राहणे मला मान्य नव्हते, त्यामुळे पुरेशी काळजी घेऊन कर्तव्य बजावल्याचे समाधान आहे. कोरोनाच्या काळात संध्याकाळी घरी जाताना डॉक्टर म्हणून शांत न बसता आपली जबाबदारी निभावल्याचे समाधान मनात असते ही भावना अत्यंत सुखावणारी आहे... वरळी येथे एनएससीआय डोम रुग्णालयात गेले तीन महिने अविरत मेहनत घेणाऱ्या डॉ. नीता वर्टी यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी वरळी एनएससीआय येथे कोरोनाचे रुग्णालय सुरू केल्यानंतर, तेथे सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर दोन दिवसांनी लगेचच काम सुरू केल्याचे डॉ. वर्टी यांनी सांगितले. एनएससीआय येथील रुग्णालय संपूर्णत: संपर्कविरहित असल्याने येथील एकाही आरोग्य कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली नाही. त्याचसोबतच, येथील प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन उपचार केले जात आहेत. या दोन्ही गोष्टी संमातरपणे करण्यासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाची खूप मदत झाली. या ठिकाणी ५०० हून अधिक खाटा, त्यात कर्करोग कोविड रुग्णांसाठी कक्ष, कुटुंब कक्ष, विलगीकरण कक्ष अशा मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असताना कॅमेºयाच्या माध्यमातून एकाच
वेळी सर्वत्र मॉनिटरिंग केले जाऊ
लागले, असे डॉ. वर्टी यांनी
अधोरेखित केले.
संवादासाठी अनोखा मार्ग
रुग्ण तपासणी कक्षात इंटरकॉमच्या माध्यमातून डॉक्टर रुग्णांशी संवाद साधू लागले. त्यामुळे रुग्णांना डॉक्टर वैयक्तिकरीत्या तपासत असल्याचा दिलासा मिळाला.
शिवाय, जागतिक पातळीवरील इटली मॉडेल, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे यांचा
अभ्यास करून त्याप्रमाणे उपचारपद्धती आणि वैद्यकीय पद्धतींचा अवलंब करीत होतो, याचा खूप फायदा झाला.
पालिकेची प्रभावी यंत्रणा
ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे अधिक आढळून येत आहेत, कारण हा संवेदनशील गट असून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. शिवाय, अतिजोखमीचे आजार असल्याने अन्य वयोगटांपेक्षा अधिक लवकर कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास या रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. याचे श्रेय येथे काम करणाºया संपूर्ण चमूचे आणि महापालिकेचेही आहे. वरळी जी साऊथ विभागाचे उपायुक्त शरद उघाडे यांनी या संपूर्ण काळात मोलाचे सहकार्य केले. या परिसरात लवकरात लवकर आजाराचे निदान होणे गरजेचे होते. त्या परिस्थितीत परिसरात मोबाइल क्लिनिकच्या माध्यमातून स्क्रीनिंग केले गेले. त्यामुळे तळागाळातील सर्व लोकांच्या तपासण्या होऊ लागल्या आणि लवकर निदान होऊ लागले, यामुळे आम्हाला मदत झाली. यानंतर या रुग्णालयात होल्डिंग सेल तयार केला, या कक्षात चाचणी न केलेल्या मात्र लक्षणे असलेल्या रुग्णांवरही यशस्वीपणे उपचार केले. आजपर्यंत या रुग्णालयात हजारांहून अधिक रुग्ण ‘कोविडमुक्त’ झाले आहेत.
आईला काळजी असतेच
एनएससीआयमध्ये रुजू होण्यापूर्वी आई सोबत राहत होती. त्या वेळी नुकतीच मुंबईत कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती, आईचे वय ८७ असल्याने तिला दुसरीकडे शिफ्ट केले. म्हणून माझी चिंता कमी झाली; मात्र आईला काळजी असतेच. रोज न चुकता सकाळी, सध्यांकाळी फोन करून विचारपूस करते. या काळात माझं कर्तव्य बजावून मी लवकरच सुखरूप भेटेन असा विश्वास तिला दिलाय, असे आवर्जून डॉ. वर्टी
यांनी सांगितले.

डॉ. नीता वर्टी ब्रीचकँडी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््स आणि लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये त्यांनी केलेल्या सर्वाधिक वजनाच्या फायब्रॉइड शस्त्रक्रियेची नोंद आहे. या शस्त्रक्रियेत लॅपेरोस्कोपिकली ५, ६ किलो वजनाच्या गर्भाशयाच्या फायब्रॉईडला दूर केले. या शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा शॉ टेक्स्टबुक आॅफ गायन्कोलॉजीमध्ये समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या बॅसल विद्यापीठामध्ये डॉ. वर्टी यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी बायकोरॉनेट गर्भाशयाच्या लेप्रोस्कोपिक पुनर्रचनेचे प्रदर्शन आयोजित केले होते. बायकोर्न्युएट गर्भाशयाच्या पहिल्या रोबोटिक युनिफिकेशनच्या रचनेच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग होता.

आयसीयू कक्ष लवकरच कार्यान्वित
एनएससीआय येथे लवकरच अतिदक्षता कक्ष सुरू होणार आहे.
जेणेकरून शहर उपनगरात कुठेही खाटांची उपलब्धता नसल्यास कोणत्याही रुग्णाला उपचारांस विलंब होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती डॉ. वर्टी यांनी दिली.

डॉ. मुफ्फजल लकडावाला प्रथितयश बेरिएट्रिकतज्ज्ञ आहेत. अनेक वर्षे वैद्यकीय सेवेत असलेल्या डॉ. लकडावाला डायजेस्टीव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉ. लकडावाला यांनी व्रणरहित बेरिएट्रिक शस्त्रक्रियेत कीर्ती मिळविली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या लकडावाला यांनी मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, बांगलादेश, चीन, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि मध्य पूर्वेकडील तसेच आशियाई देशांत अध्यापन कार्यशाळा व लाइव्ह शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिले आहे. ते छायाचित्रकार व राष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेटपटूही आहेत.

Web Title: CoronaVirus doctor working in worli dome express Satisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.