Join us  

“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:05 PM

आभासी रडू नका,या सत्यावर बोला, मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या असा घणाघात आशिष शेलारांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली.आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले.मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत?

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे वाभाडे काढण्यात दंग आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला "आघाडीची तीन माणसं" धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

याबाबत आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या"तीन माणसांच्या" दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि "तीन माणसं" एकमेकाकडे बघत बसले. आघाडीची "तीन माणसं" बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे. आधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासून महाराष्ट्राला वाचवा! रडू नका असा टोला लगावला आहे.

तसेच महाराष्ट्रद्रोही तर तुम्ही आहात. तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली. गेली २० वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे ३३ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना  उपचार देत आहात. हा आभास नाही सत्य आहे, आभासी रडू नका,या सत्यावर बोला, मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या असा घणाघात शेलारांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर केला.

दरम्यान, आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली! काँग्रेस पळून दाखवतेय. किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा, आघाडीची तीन माणसं" बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? अशा प्रश्नांचा भडीमार भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश

तणाव वाढला! भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा

छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…

भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

 

टॅग्स :आशीष शेलारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा