Coronavirus : बेस्टचे कामगार सोमवारपासून घरीच, कृती समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:27 AM2020-05-16T07:27:44+5:302020-05-16T07:28:48+5:30

कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक मागण्या मान्य न केल्यास सोमवारपासून बेस्ट कर्मचारी घरीच राहतील, असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीने दिला आहे.

Coronavirus : BEST workers at home from Monday, warning action committee | Coronavirus : बेस्टचे कामगार सोमवारपासून घरीच, कृती समितीचा इशारा

Coronavirus : बेस्टचे कामगार सोमवारपासून घरीच, कृती समितीचा इशारा

Next

मुंबई : लॉकडाउनच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू रहावी, यासाठी मुंबईची दुसरी जीवन वाहिनी असलेली ‘बेस्ट’ सेवा सुरू आहे. मात्र यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये संसर्गाचा धोका वाढला असून आतापर्यंत ९५ जण कोरोनाबाधित असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक मागण्या मान्य न केल्यास सोमवारपासून बेस्ट कर्मचारी घरीच राहतील, असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीने दिला आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर शहरात संपूर्णत: लॉकडाउन करण्यात आले. मात्र आरोग्य, सुरक्षा, आपत्कालीन अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना बेस्टच्या वाहतूक विभागामुळे दररोज कार्यालयात पोहचणे शक्य होते. परंतु, जीवाचा धोका पत्करून कामावर येणाºया बेस्टच्या वाहतूक आणि विद्युत विभागातील कर्मचाºयांच्या आरोग्याकडे पालिका आणि बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करून कामावर येणाºया कर्मचाºयांना पगार कपातीची धमकी दिली जात असल्याची नाराजी कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे.

हा, वेतन नव्हे तर नोकरकपातीचा डाव
बेस्ट उपक्रमातील ६० टक्के कामगार, कर्मचारी मुंबई हद्दीच्या बाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत. काही कर्मचाºयांच्या इमारती, वस्ती सील झाल्याने ते अडकून पडले आहेत. मात्र त्यांची गैरसोय समजून घेतली जात नाही. बेस्ट उपक्रमाचा डाव हा वेतन कपातीचा नसून भविष्यात नोकर कपातीचा असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बेस्ट कामगार, कर्मचारी येत्या सोमवारपासून १०० टक्के लॉकडाउन पाळून उत्तर देतील, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.

कामगारांच्या काही प्रमुख मागण्या
प्रत्येक बेस्ट कामगाराची कोरोना चाचणी दैनंदिन पातळीवर बस आगारातील वैद्यकीय अधिकाºयांंमार्फत केली जावी.
बाधित व कोरोनाची लक्षणे असलेल्या बेस्ट कर्मचाºयांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करणे.
कोरोनाची लक्षणे दिसून न येणाºया परंतु बाधित असलेल्या कर्मचाºयांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करावे.
एखादा कर्मचारी बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाºयासाठी विलगीकरण प्रक्रिया राबवावी.
मास्क, सॅनिटायझर इत्यादी सुरक्षा साधणे त्वरित पुरवण्यात यावी.
कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि कोरोना बाधित होऊन मृत्यूमुखी पडलेल्या बेस्ट कर्मचारी, तसेत इतर आस्थापनातील कर्मचारी व पोलीस यांना शहीद दर्जा देऊन इतर सवलती द्याव्या.
कर्मचाºयांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार देणे.
कर्मचारी व कुटुंबियांना एक कोटीचे विमा संरक्षण, कर्मचाºयांना ने -आण करण्यासाठी स्वतंत्र बस सेवा उपलब्ध करून द्यावी.

Read in English

Web Title: Coronavirus : BEST workers at home from Monday, warning action committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.