Coronavirus : लॉकडाऊनमध्ये शहरी, ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासींसाठी 'संवाद'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 20:57 IST2020-04-19T20:56:08+5:302020-04-19T20:57:29+5:30

Coronavirus : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने 'प्रोजेक्ट मुंबई' व  'प्रफुल्लता' या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणार्‍या संस्थांच्या सहकार्याने 'संवाद' हा अभिनव उपक्रम १९ एप्रिलपासून  संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.

Coronavirus: The basis of 'sanwad' for urban, rural and tribal citizens in Lockdown | Coronavirus : लॉकडाऊनमध्ये शहरी, ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासींसाठी 'संवाद'चा आधार

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये शहरी, ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासींसाठी 'संवाद'चा आधार

मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी  नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १८०० १०२ ४०४० या  हेल्पलाईन टोल फ्री सेवेची माहिती दिली.  

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने 'प्रोजेक्ट मुंबई' व  'प्रफुल्लता' या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणार्‍या संस्थांच्या सहकार्याने 'संवाद' हा अभिनव उपक्रम १९ एप्रिलपासून  संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.  संवाद उपक्रमाच्या अंतर्गत  हेल्पलाइन  क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना समुपदेशकांशी संवाद साधता येणार आहे.

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील ३० समुपदेशक मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत या नागरिकांशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संवाद साधणार असून ग्रामीण, शहरी भागातील  नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होणार आहे. 

सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे मानसिक आरोग्यही  चिंतामुक्त ठेवण्यासाठी  'संवाद' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार  आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे. शहरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच आदिवासींना तणाव जाणवत असल्यास यांच्याशी संवाद होणे महत्त्वाचे आहे.  याच दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने 'प्रोजेक्ट मुंबई' व 'प्रफुल्लता' या संस्थांच्या सहकार्याने 'संवाद' नावाचा  हा उपक्रम १९ एप्रिल पासून  सुरु करण्यात आला आहे. 

‘संवाद हेल्पलाइनच्या माध्यमातून आर्थिकदृत्ष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक आणि आदिवासींचे समुपदेशन केले जाणार आहे,’’असे  आदिवासी विकास मंत्री श्री. के. सी. पाडवी यांनी सांगितले. तसेच ‘’या उपक्रमाच्या माध्यमातून संवादाची साखळी तयार होणार असून ग्रामीण भाग, आदिवासी पाडे येथील नागरिकांशी समुपदेशनाशी जोडले जाणार आहेत. यामुळे नागरिकांचा तणाव दूर होण्यास मदत होणार आहे’’, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 
 
सध्याच्या लॉकडाउनच्या काळात केवळ  शहरी भागातील नागरिकांशीच नव्हे तर  दुर्गम, ग्रामीण भागातील नागरिक, आदिवासी यांचे राज्य शासनाच्या  उपक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे.  यासाठी सर्व विभागांनी सहकार्य केले आहे.   या संवाद उपक्रमामुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास सहकार्य होईल, अशी आशा आहे.

असा आहे 'संवाद' उपक्रम 
महाराष्ट्रातील कोणत्याही  नागरिकाला 'संवाद'च्या  १८०० १०२ ४०४० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, चिंता यांचे निरसन मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून करून घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ३० मानसोपचार तज्ञ समुपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. हे मानसोपचार तज्ञ समुपदेशक त्या जिल्ह्यातील  असून  नागरिकांची स्थानिक बोली जाणणारे आहेत. 
 

Web Title: Coronavirus: The basis of 'sanwad' for urban, rural and tribal citizens in Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.