CoronaVirus भाईंदरमध्ये 7 महिन्याच्या बाळाला कोरोना; आज एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:31 PM2020-05-05T21:31:58+5:302020-05-05T21:32:24+5:30

पालिकेने मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार दिवसभरात  कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळले आहेत .

CoronaVirus Another patient found of Corona in Bhainder | CoronaVirus भाईंदरमध्ये 7 महिन्याच्या बाळाला कोरोना; आज एकाचा मृत्यू

CoronaVirus भाईंदरमध्ये 7 महिन्याच्या बाळाला कोरोना; आज एकाचा मृत्यू

Next

मीरारोड - भाईंदर मध्ये दोन दिवसात कोरोनाचे दोन बळी गेले असून हे दोन्ही मृत्यू भाईंदरच्या शिवसेना गल्ली परिसरात झाले आहेत . जेणे करून मीरा भाईंदर मधील कोरोना मृत्यूंची संख्या 5 झाली आहे . तर दिवसभरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले असून त्यात 7 महिन्याच्या बाळासह त्याच्या आईचा समावेश आहे . एकूण कोरोना रुग्णांची संख्या 190 झाली आहे . 

भाईंदरच्या शिवसेना गल्लीतील 67 वर्षीय महिलेचा सोमवारी पालिकेच्या भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला . सदर महिलेस हृदयाचा आजार होता व तिला आधी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.  तर रविवारी रात्री याच शिवसेना गल्लीतील 50 वर्षीय इसमाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. सदर इसमास खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. भाईंदर मधील एकाच परिसरात कोरोनाचे सलग दोन दिवसात दोन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे . या आधी मीरारोड मध्ये कोरोना मुळे तिघांचा मृत्यू झालेला आहे. 

पालिकेने मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार दिवसभरात  कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळले आहेत . त्यात भाईंदर पूर्वेच्या गीता नगर जवळ 7 महिन्याचे बाळ व त्याच्या आईला कोरोनाची लग्न झालेली आहे . हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरच्या चालका शी ते संपर्कात आले होते . नव्याने सापडलेल्या रुग्णात शीतल नगर मध्ये राहणारी बीच कॅंडी रुग्णालयातील परिचारिका व भाईंदरच्या ज्योती पार्क मध्ये राहणारे मुंबई महापालीकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी  कोरोनाग्रस्त झाले आहेत . 

नया नगरच्या हैदरी चौक भागात राहणारे व मुंबई महापालिकेच्या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करणारे  मॅकेनिक यांचा मृत्यू झाला होता . त्यांच्या संपर्कातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे . क्लासिक काऊंटी मधील आणखी दोघांना कोरोना झाला असून त्यात 6 वर्षांचा मुलगा आहे .  दिवसभरात 9 नवीन रुग्ण सापडले असले तरी 12 रुग्ण बरे झाले आहेत .  शहरात एकूण कोरोनाचे 190 रुग्ण झाले असून त्यातील 114 जण बरे झाले आहेत. अजून 43 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे . 

Web Title: CoronaVirus Another patient found of Corona in Bhainder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.