Coronavirus: मुंबईत ५८७५ इमारती पालिकेने केल्या सील; रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:00 AM2020-07-03T02:00:03+5:302020-07-03T07:07:28+5:30

७५० बाधित क्षेत्रात २५ हजार ९३१ रुग्ण सापडले आहेत. तर ४७ लाख १३ हजार ७७९ नागरिक या क्षेत्रांमध्ये राहतात. ५८७५ सील इमारतींमध्ये १६ हजार २१७ रुग्ण सापडले. तर १४ लाख ३१ हजार ५१२ नागरिक राहतात.

Coronavirus: 5875 buildings sealed by Municipal Corporation in Mumbai; The duration of patient doubling increased | Coronavirus: मुंबईत ५८७५ इमारती पालिकेने केल्या सील; रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

Coronavirus: मुंबईत ५८७५ इमारती पालिकेने केल्या सील; रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

googlenewsNext

शेफाली परब-पंडित 

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. गेल्या तीन आठवड्यांत ७९८ बाधित क्षेत्रांपैकी रुग्ण आढळून न आलेली ४८ क्षेत्र खुली करण्यात आली. मात्र या काळात प्रतिबंधित इमारतींचे प्रमाण ४५३८ वरून ५८७५ वर पोहोचले आहे. यापैकी बोरीवली आणि अंधेरी पूर्व येथे प्रतिबंधित इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याचे उजेडात आले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण परिसरात प्रवेश बंदी करण्यात येत होती. यामुळे मुंबईतील बाधित क्षेत्रांची आकडेवारी अडीच हजारांहून अधिक होती. मात्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा नियम बदलून संपूर्ण परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर न करता पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेली इमारत अथवा त्या इमारतींचा बाधित मजला सील करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईत आता बाधित क्षेत्रापेक्षा प्रतिबंधित इमारतींची संख्या अधिक आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत ३०९७ इमारती सील तर ६९६ बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. परंतु, ३ जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यास सुरुवात झाल्यानंतर या आकडेवारीतही वाढ होताना दिसून येत आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ७९८ बाधित क्षेत्र, तर ४५३८ इमारती सील केल्या होत्या.

पुन:श्च हरिओमनंतर झाली वाढ
मुंबईत ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी सम-विषम पद्धतीने दुकाने, मर्यादित कर्मचारी संख्येने खासगी व सरकारी कार्यालये, जॉगिंग-फेरफटका, मंडई सुरू करण्यात आली आहेत. यामुळे बेस्ट बसमधून दररोज सरासरी नऊ लाख मुंबईकर प्रवास करीत आहेत. रस्त्यावर वर्दळ वाढल्यामुळे रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.

७५० बाधित क्षेत्रात २५ हजार ९३१ रुग्ण सापडले आहेत. तर ४७ लाख १३ हजार ७७९ नागरिक या क्षेत्रांमध्ये राहतात. ५८७५ सील इमारतींमध्ये १६ हजार २१७ रुग्ण सापडले. तर १४ लाख ३१ हजार ५१२ नागरिक राहतात.

Web Title: Coronavirus: 5875 buildings sealed by Municipal Corporation in Mumbai; The duration of patient doubling increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.