Join us  

Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 3:53 PM

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत.

मुंबई - जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, याच कालावधीत उझबेकिस्तानमध्ये जवळपास 39 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र लिहले आहे.  

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. या दौऱ्यानुसार 17 मार्च रोजी त्यांचे रिटर्न तिकीट होते. मात्र, अचानकपणे त्यांना रिटर्न्स फ्लाईट उपलब्ध नसून आपण भारतीय परराष्ट्र खात्याशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले आहे. उझबेकिस्तान येथे अडकलेल्या या 39 मराठी जनांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहून या नागरिकांची देशवापसी करण्याची विनंती केली आहे. मात्र, आपण विदेशात अडकून पडल्याने त्यांना धास्ती लागली आहे. तर, या 39 नागरिकांचे कुटुंबीय त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून आहे.  

उझबेकिस्तानमध्ये पर्यटनासाठी या सर्व मित्रांनी डिसेंबर महिन्यात बुकींग केले होते. या नियोजित दौऱ्यानुसार ते भारतातून उझबेकीस्थानला जाणार होते. त्यावेळी तिथे कोरोनाची लागण किंवा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे या 39 महाराष्ट्रीय नागरिकांनी उझबेकिस्तान एअरवेजशी बोलून नियोजित दौरा केला. मात्र, परतीच्या प्रवासावेळी अचानक विमानसेवा रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच, भारतीय परराष्ट्र खात्याशी संपर्क करण्याचेही सूचवले. त्यामुळे हे सर्व भारतीय, महाराष्ट्रीय प्रवाशी अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत. आपल्या परीने त्यांनी संबंधित नेत्यांशी संपर्क साधला असून शरद पवार यांनी परराष्ट्र खात्याला पत्र लिहून या प्रवासांची लवकरात लवकर घरवापसी करण्याची विनंती केली आहे. तसेच, सांगलीचे खासदार संजय (काका) पाटील यांनीही यासंदर्भात परराष्ट्र खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. 

दरम्यान, उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या 39 नागरिकांमध्ये सांगली जिल्ह्यातील 13, कोल्हापूर 1,  सोलापूर 13, नाशिक 1, पुणे 11 अशी संख्या आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टर्सं आहेत.  

 

टॅग्स :शरद पवारकोरोनाएअर इंडियासांगलीकोल्हापूरसोलापूर