रस्ते खोदून केबलमधून कॉपर वायरची चोरी, ६ जण ताब्यात; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:06 IST2026-04-09T12:05:58+5:302026-04-09T12:06:18+5:30

मालाडमधून ६ जण ताब्यात; दिंडोशी पोलिसांची कारवाई

Copper wire stolen from cables by digging up roads, 6 people arrested; Property worth Rs 2.5 lakh seized! | रस्ते खोदून केबलमधून कॉपर वायरची चोरी, ६ जण ताब्यात; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त!

रस्ते खोदून केबलमधून कॉपर वायरची चोरी, ६ जण ताब्यात; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एमटीएनएल केबल चोरीचा असाही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात बीएमसीकडून खोदकामाचे कंत्राट मिळाल्यानंतर हे काम करतानाच एमटीएनएल केबल चोरी करण्यात आली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट कोऑर्डिनेटर, सुपरवायझर आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

एमटीएनएलचे डेप्युटी मॅनेजर अजय द्रविडा (५४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वर्क असिस्टंट सुमेरू कुरील यांनी अप्पर गोविंदनगर, मालाड पूर्वेतील बीएमसी गार्डनसमोर काही जण बेकायदेशीरपणे रस्ते खोदकाम करत असल्याची माहिती दिली. या खोदकामादरम्यान एमटीएनएलची कॉपर केबल काढली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर द्रविडा घटनास्थळी पोहोचले असता, टाटा हिताची पोकलॅन मशीनच्या साहाय्याने केबल खोदून काढण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान सुपरवायझर प्रविण चौगुले याने हे काम बीएमसीच्या कामासाठी असल्याचे सांगितले. मात्र, यासाठी एमटीएनएलची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना रंगेहाथ पकडले. या आरोपींमध्ये सुपरवायझर, प्लंबर, चालक आणि मजुरांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात कॉन्ट्रॅक्ट को-ऑर्डिनेटर चेतन बिश्णोई याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे ४० मीटर व १० मीटर लांबीच्या कॉपर केबलसह अंदाजे २.५० लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title : मुंबई में MTNL केबल चोरी: छह गिरफ्तार, तांबे के तार जब्त

Web Summary : मुंबई में BMC सड़क कार्य की आड़ में MTNL के तांबे के केबल चोरी करने के आरोप में छह लोगों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने ₹2.5 लाख मूल्य के चोरी किए गए तांबे के तार जब्त किए। संदिग्धों में एक सुपरवाइजर, प्लंबर और मजदूर शामिल हैं; एक अनुबंध समन्वयक भी शामिल है।

Web Title : MTNL Cable Theft: Six Arrested, Copper Wire Seized in Mumbai

Web Summary : Six individuals were arrested in Mumbai for stealing MTNL copper cables under the guise of BMC roadwork. Police seized ₹2.5 lakhs worth of stolen copper wire. The suspects include a supervisor, plumbers, and laborers; a contract coordinator is also implicated.