वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:27 PM2020-07-12T14:27:52+5:302020-07-12T14:28:35+5:30

वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत.

Consumers should send meter readings themselves | वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

googlenewsNext

 

मुंबई : महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी  केले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १ जुलैपासून कंटेनमेन्ट झोन वगळता सर्व ग्राहकांचे मीटर रिडींग घेण्यात येत आहे. तरी, कंटेनमेन्ट झोन सोबतच इतर ग्राहकांनी स्वतः रिडींग पाठवल्यास संबंधीत वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींग असल्याची खात्री करता येते म्हणून शक्य असल्यास ग्राहकांनी स्वतःचे मीटर रिडींग पाठवावे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे,  २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले होते. तसेच वीजबिल भरणा केंद्रही बंद करण्यात आले होते. आता महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे, असे एसएमएस  मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना वारंवार पाठविण्यात येत आहे. वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जर  कंटेनमेंट झोनमधील ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठविणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल, म्हणून ग्राहकांना आपले मीटर रिडींग पाठविण्याचे आवाहन करण्यात आहे.

 

Web Title: Consumers should send meter readings themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.