पर्यावरणाचे संवर्धन ही जीवनशैली बनावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:20 AM2021-01-02T01:20:37+5:302021-01-02T07:03:56+5:30

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे.

Conservation of the environment should be a way of life; Chief Minister Uddhav Thackeray's appeal to the people | पर्यावरणाचे संवर्धन ही जीवनशैली बनावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

पर्यावरणाचे संवर्धन ही जीवनशैली बनावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

Next

मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता, ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माझी वसुंधरा’ ई-शपथ (ई-प्लेज) उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज या उपक्रमाचा ऑनलाइन कार्यक्रमात आरंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली.

Web Title: Conservation of the environment should be a way of life; Chief Minister Uddhav Thackeray's appeal to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.