काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:11 AM2024-03-24T06:11:21+5:302024-03-24T06:12:22+5:30

फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रति काँग्रेसकडे काहीच योजना नाहीत, अशा शब्दांत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Congress's 'rocket' does not fly: Minister Piyush Goyal | काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्ष पुन:पुन्हा लाँच करतो. देश चंद्रावर पोहोचला मात्र काँग्रेसचे हे ‘रॉकेट’ उडतच नाही. फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रति काँग्रेसकडे काहीच योजना नाहीत, अशा शब्दांत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. झोपडपट्टीमुक्त भारताची सुरुवात उत्तर मुंबईपासून करणार असल्याची ग्वाही दिली.  

मागाठाणे विधानसभेतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला पीयूष गोयल यांनी संबोधित केले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, भाजपचे मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडल अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला अध्यक्षा रश्मी भोसले, ॲड. शिवाजीराव चोगले, कृष्णकांत दरेकर, नगरसेविका प्रीतम पंडागळे, चित्रपट आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परुळेकर, आरपीआयचे रमेश गायकवाड यांसह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पुरुष आणि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

  कार्यकर्त्यांचा आधार, मेहनत व आशीर्वादामुळे अनेक वर्षांच्या तपस्येनंतर भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ७० वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, अनेक समस्या झेलल्या, संकटांना तोंड दिले. कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत स्थितीत आहे, असे गोयल म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये जनतेला दिलेल्या योजनांची माहिती दिली. 

  पंतप्रधान मोदी यांनी गरिबाच्या कल्याणाचा, या देशातून गरिबी हटविण्याचा, भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी २०४७ पर्यंत भारताने विश्वशक्ती बनविण्याचा संकल्प केला आहे. तिसऱ्या टर्मला भारत पाच ट्रिलियन डॉलर पार जाणार आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार, असे गोयल म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अन्य शहरांना स्लम मुक्त करू, असे गोयल म्हणाले.

Web Title: Congress's 'rocket' does not fly: Minister Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.