Maha Vikas Aghadi: “शरद पवारांमुळेच ठाकरे सरकारचं काम जोरात…”; काँग्रेसच्या नेत्याचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:26 PM2022-01-25T17:26:55+5:302022-01-25T17:29:27+5:30

काँग्रेस नेत्याने म्हटले आहे की, कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल, पण…

congress yashomati thakur praise ncp sharad pawar and criticised thackeray govt on coastal road | Maha Vikas Aghadi: “शरद पवारांमुळेच ठाकरे सरकारचं काम जोरात…”; काँग्रेसच्या नेत्याचं सूचक विधान

Maha Vikas Aghadi: “शरद पवारांमुळेच ठाकरे सरकारचं काम जोरात…”; काँग्रेसच्या नेत्याचं सूचक विधान

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकर सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल आहे, असेही चित्र नाही. यातच आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची स्तुति केली असून, शिवसेनेला टोला लगावला आहे. शरद पवार आहेत, म्हणूनच ठाकरे सरकारचे काम जोरात सुरू आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राज्य महिला आयोगाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता अशा विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. पदभार स्विकारल्यापासून सातत्याने महिला धोरणासंदर्भात मी पाठपूरावा करत आहे. कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालये आहे मग आपल्याकडे का नाही, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

शरद पवारांमुळेच ठाकरे सरकारचं काम जोरात

महाविकास आघाडीचे सरकार अजून बरेच कामे करु शकते असे सांगतांना शरद पवार आहेत म्हणून सरकार जोरात सुरु आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले. पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महिला आयोगाने याकडे लक्ष द्यायला हवे. मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर फार आरडाओरडा करतात, असे ऐकालया मिळते. एकवेळ कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल. पण, महिला आणि मुलांना पैसे मिळालेच पाहिजेत. हा अट्टहास मी धरणारच, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाविकास आघीच्या पुढच्या तीन वर्षाच्या काळामध्ये आपण महिला आयोगाच्या व्यासपीठावरून कामे करु शकतो. ज्याद्वारे घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ यासंदर्भात ताकीद मिळू शकते, असे त्या म्हणाल्या. 
 

Web Title: congress yashomati thakur praise ncp sharad pawar and criticised thackeray govt on coastal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.