VIDEO: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; घोषणा देत असताना नेते बैलगाडीवरून कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:43 IST2021-07-10T15:42:51+5:302021-07-10T15:43:49+5:30
मुंबईत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; बैलगाडीवरून नेते कोसळले

VIDEO: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; घोषणा देत असताना नेते बैलगाडीवरून कोसळले
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये एप्रिलमध्ये निवडणुका असताना पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांनी पेट घेतला आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूदेखील महागल्या आहेत. वाढत्या इंधन दरांविरोधात काँग्रेसनं मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चाला काँग्रेस नेते बैलगाडीतून आले. मात्र बैलगाडीवरील वजन वाढल्यानं ती कोसळली आणि काँग्रेस नेते जमिनीवर पडले.
इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मुंबईत मोर्चा; बैलगाडीला वजन न पेलवल्यानं काँग्रेस नेते कोसळले https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/kJ2gjSNEF5
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2021
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.