Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 04:57 PM2018-05-18T16:57:44+5:302018-05-18T16:57:44+5:30

भारताच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीची अशी थटटा झाली...

'Congress will have power in Karnataka, we will prove majority tomorrow' | Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू'

Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू'

Next

मुंबई -  भाजपने कर्नाटक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन करून लोकशाहीचा खुन केलेला आहे. भाजपने लोकशाही पायदळी तुडवलेली आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीची अशी थट्टा झालेली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे संपूर्ण देशामध्ये ‘लोकशाही वाचवा दिवस” – एक दिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. भाजपच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे सुद्धा अमर जवान ज्योति जवळ, आझाद मैदान जवळ ‘एक दिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन’ करण्यात आले, त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हे उद्गार काढले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, आमदार भाई जगताप, उपस्थित होते. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, भाजपने सर्व सरकारी संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. सर्व सरकारी संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जोडगोळीच्या दबावाखाली कार्यरत आहेत. यांच्या दादागिरी आणि गुंडगिरी पुढे सर्व संस्था व यंत्रणा झुकलेल्या आहेत. त्यामध्येच आज सकाळी सर्वोच्य न्यायालयाने आम्हाला खूप आनंदाची बातमी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या बहुमताला आणि सत्ता स्थापनेला स्थगिती देऊन उद्या पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहे. माझा सर्वोच्च न्यायालयाला सलाम आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद करतो. कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या नक्की बहुमत सिद्ध करू. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. गुजरात निवडणूक झाली आणि आत्ता कर्नाटकमध्ये निवडणूक झाली, आमचे राहुल गांधी एकटे भाजपच्या संपूर्ण टीमसमोर लढले. राहुल गांधी यांच्यासमोर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सर्व त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व सरकारी यंत्रणाव संस्था होत्या तरी हि राहुल गांधी आणि काँग्रेसवर लोकांनी विश्वास ठेऊन मतदान केले आणि एवढ्या चांगल्या सीट्स आपण जिंकू शकलो. लोक भाजपला व त्यांच्या गुंडगिरीला कंटाळलेले आहेत, नोटाबंदी आणि जीएसटीने पूर्ण व्यापारी वर्ग नाराज आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मंत्रालयात आत्महत्या होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे आणि अधिक जोमाने तयारी सुरु करायला पाहिजे. कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अशी सूचना संजय निरुपम यांनी दिली.

 

Web Title: 'Congress will have power in Karnataka, we will prove majority tomorrow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.