काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंगळवारी नाणारच्या दौ-यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 17:23 IST2018-05-01T17:23:31+5:302018-05-01T17:23:31+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण उद्या दि. २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

Congress state president Ashok Chavan on Visit Tuesday for Nanar | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंगळवारी नाणारच्या दौ-यावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंगळवारी नाणारच्या दौ-यावर

 मुंबई  - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण उद्या दि. २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांसोबत असतील.

नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने खा. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी खा. अशोक चव्हाण यांना नाणारला जाण्याची सूचना केली होती. त्यांच्या सुचनेनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण उद्या नाणारला जाणार आहेत. उद्या सकाळी ११.३० वाजता खा. अशोक चव्हाण कात्रादेवी सागवे ता. राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. 

Web Title: Congress state president Ashok Chavan on Visit Tuesday for Nanar