कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:27 IST2025-10-19T05:26:53+5:302025-10-19T05:27:16+5:30
हा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापुरुष आणि देवदेवतांच्या नावाने असलेल्या स्थानकांजवळ वा चौकांजवळ उभारलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकांना कार्पोरेट कंपन्यांची नावे देऊन धार्मिक आणि राष्ट्रीय शब्दांचा अपमान महायुतीने केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे हिंदुत्व कार्पोरेट झाले असून पैशासाठी त्यांनी देव, आराध्य दैवत व ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आयसीआयसीआय लोम्बार्ड, महालक्ष्मीचे एचडीएफसी लाईफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निप्पॉन एमएफ असे नामकरण केले आहे. अस्मितांशी चालवलेला हा खेळ संतापजनक आहे. हा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, असेही सावंत म्हणाले.