Join us  

भाजपा आयटी सेल व इतर समाजकंटकांवर कारवाईसाठी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 9:34 PM

Sachin Sawant : देशपातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता अत्यंत द्वेशपूर्ण अपप्रचार समाजमाध्यमातून केला जात आहे. यामागे भाजपा, त्याचे नेते आणि भाजपाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत.

मुंबई - भाजपाच्या आयटी सेलकडून तसेच इतर समाजसंटकांकडून होणाऱ्या अपप्रचाराविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.देश पातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता सोशल मीडियातून होणाऱ्या अत्यंत द्वेषपूर्ण अपप्रचारावर नियंत्रण आणून भाजपा आयटी सेल व इतर समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

या पत्रात सचिन सावंत म्हणतात की, देशपातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता अत्यंत द्वेशपूर्ण अपप्रचार समाजमाध्यमातून केला जात आहे. यामागे भाजपा, त्याचे नेते आणि भाजपाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत. लोकांमध्ये द्वेश निर्माण करण्याकरिता खोट्या माहितीचा प्रसार इतर पक्षाच्या नेत्यांचे चारित्र्यहनन आणि अफवा पसरवणारी माहिती पसरवली जात आहे. यासाठी भाजपाकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तसेच त्यासाठी काही खासगी कंपन्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

“भाजपला आणण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आडमुठी भूमिका”

पाच वर्ष सत्तेत राहून भाजप विटीदांडू खेळत होते का? : सचिन सावंत

'त्या' भाजपा नेत्यांनी आता देवेंद्र फडणवीसांच्या जामिनाबाबत बोलावं; काँग्रेसचा टोला

२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालान्वये आयटी अॅक्टमधील कलम ६६ (अ) रद्द केल्यानंतर सायबर कायदा कमकुवत झाला आहे. त्याचाच फायदा भाजपाची ही मंडळी आणि समाजकंटक उचलत आहेत. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते तर समाजमाध्यमातून खुल्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा ,समाजमाध्यमात वापरत असतात. यातून देशाची आणि राज्याची सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे या अपप्रचारावर नियंत्रण आणून समाजकंटकावर कारवाईचा विचार व्हावा,’असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

  

टॅग्स :सचिन सावंतकाँग्रेसभाजपासोशल मीडियाउद्धव ठाकरे