काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला, विजय वडेट्टीवारांना दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:54 AM2023-08-01T10:54:49+5:302023-08-01T10:57:01+5:30

काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं. 

Congress Leader of Opposition for vidhansabha, Vijay Vadettiwar gets second chance | काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला, विजय वडेट्टीवारांना दुसऱ्यांदा संधी

काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला, विजय वडेट्टीवारांना दुसऱ्यांदा संधी

googlenewsNext

राज्याच्या राजकारणा गेल्या काही महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे, सत्तेतील नेते विरोधात आणि विरोधातील नेतेमंडळी सत्तेत गेल्याचं पाहायला मिळालं. या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांच्या नेतृत्वात बंड करत भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर, राष्ट्रवादीचे इतर ९ आमदार मंत्री बनले आहेत. त्यामुळे, राज्याचे विरोधी पक्षनेतेपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. तेथे आता काँग्रेस नेत्याची नियुक्ती होणार आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. 

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वतः वडेट्टीवार यांनी फेसबुक पेजवर आनंदाची बातमी विरोधी पक्षनेता होणार, अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली होती. आता, काँग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर, विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आता, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याबाबत पत्र दिले जाईल. त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करतील. 

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात अखेरच्या तीन महिने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली होती. आता, दुसऱ्यांदा त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळत आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं. 

दरम्यान, यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. आता, काँग्रेसकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले असून विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित झाले आहे. 
 

Web Title: Congress Leader of Opposition for vidhansabha, Vijay Vadettiwar gets second chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.