Join us

अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 06:03 IST

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेने आ. भास्कर जाधव यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र, मित्रपक्ष काँग्रेसनेविधान परिषदेच्या विरोधी पक्षेनेतेपदावर दावा सांगून उद्धवसेनेची कोंडी केली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. तीत काँग्रेसने जाधव यांच्या नावाला पाठिंबा दिला. मात्र, विधान परिषदेत काँग्रेसची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी केली. तर शरद पवार गटाने अडीच-अडीच वर्षे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद मिळावे असा फॉर्म्युला दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंपरा व नियमानुसार आम्ही मागणी करत आहोत, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :विधान भवनविधान परिषदविधानसभामहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडीशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस